करोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होताना दिसतं आहे. देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात हाल होत आहेत ते हातावर पोट असलेल्या कामगारांचे. या कामगारांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर केला जातो आहे. या सहाय्यता निधीला भरभरुन दान दिलं जातं आहे. सगळ्याच राज्यांमध्ये हे दान दिलं जातं आहे. अशात आंध्रप्रदेशातल्या एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. हेमंत असं याच वर्षांच्या मुलाचं नाव आहे चार वर्षांच्या हेमंतचं सगळीकडे कौतुक होतं आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाउन या मुलाने आपले सायकलसाठी जमा केलेले ९७१ रुपये हे सीएम रिलिफ फंडासाठी दिले आहेत. या मुलाने केलेल्या या कृत्याचं कौतुक होतं आहे.

सध्या देशभरात करोनाचा कहर असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात मेहबुबा मुफ्ती यांना घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र त्यांची नजरकैद संपलेली नाही. PSA च्या अंतर्गत मुफ्ती यांना घरी पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांची नजरकैद संपलेली नाही.