News Flash

सीआरपीएफच्या जवानाची आत्महत्या; स्वतःवरच झाडली गोळी

नागपूरमधील पवन नगर येथील होते रहिवासी

सीआरपीएफच्या जवानाची आत्महत्या; स्वतःवरच झाडली गोळी
प्रातिनिधीक छायाचित्र

केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमधील जवाहरनगर येथे घडली आहे. बबन विठ्ठलराव मनवर असे या जवानाचे नाव आहे. आपल्या सर्विस रायफलने स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बबन मनवर हे मुळचे नागपूर जिल्ह्यातील पवन नगर येथील होते. २००४ मध्ये ते सीआरपीएफमध्ये भरती झाले होते.

या अगोदर छत्तीसगड सशस्त्र दल (सीएएफ) चे जवान अनिल यादव यांनी ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या सर्विस रायफलने स्वतःवर गोळू झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 8:27 am

Web Title: a 40 year old crpf constable baban vithal rao manwar committed suicide msr 87
Next Stories
1 Coronavirus : पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द
2 राणा कपूर यांना अटक
3 आयसिसशी संबंधित दाम्पत्याला अटक
Just Now!
X