24 October 2020

News Flash

बॉलच्या शोधात भिंत ओलांडणाऱ्या १७ वर्षीय मुलावर सुरक्षारक्षकाने झाडली गोळी

सध्या मुलगा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरु आहेत

(संग्रहित छायाचित्र)

लखनऊत एका व्यवसायिकाच्या खासगी सुरक्षारक्षाकने बॉलच्या शोधात भिंत ओलांडणाऱ्या १७ वर्षीय मुलावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. गोरखनाथ परिसरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. अरविंद कुमार असं या मुलाचं नाव आहे. सध्या तो रुग्णालयात दाखल असून उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे.

सुरक्षारक्षक सुमित सिंह याने झाडलेली गोळी अरविंद कुमारच्या डोक्याला लागली आहे. अरविंद याला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं होतं. पण परिस्थिती गंभीर असल्याने त्याला लखनऊमधील एसजीपीजीआय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं. ज्या परिसरात हा गोळीबार झाला तो चंद्रप्रकाश अग्रवाल यांच्या मालकीचा आहे. चंद्रप्रकाश अग्रवाल हे शहरात मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात.

“आम्ही बाहेर खेळत असताना बॉल इमारतीच्या आत गेला. अरविंद बॉल आणण्यासाठी भिंतीवर चढला असता सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. गोळीबार झाल्याचं ऐकल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली आणि आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला”, अशी माहिती एका स्थानिकाने दिली आहे.

अरविंदच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:17 pm

Web Title: a boy shot by businessmans guard after he scale wall in search for ball in lucknow sgy 87
Next Stories
1 धक्कादायक! वर्गात विद्यार्थ्यांसमोर पतीने शिक्षिकेची केली हत्या
2 काश्मीर प्रकरणी तिसऱ्या पक्षाशी चर्चा नाहीच; जयशंकर यांचे स्पष्टीकरण
3 ग्राहकांच्या घराचा EMI भरण्यास बिल्डरांना मनाई
Just Now!
X