ओदिशा येथील गोल्डमॅनने सोन्याचा मास्क तयार केला आहे. हा गोल्डमॅन ओदिशा येथील कटकचा आहे. कटकमधल्या या व्यावसायिकाने आता सोन्याचा मास्क तयार केला आहे. या मास्कची किंमत साडेतीन लाखांच्या घरात आहे. मी चाळीस वर्षांपासून सोनं अंगावर बाळगून आहे. मला कटमध्ये गोल्डमॅन म्हटलं जातं. मी टीव्हीवर पाहिलं की एका मराठी माणसाने गोल्ड मास्क तयार केला. त्यामुळे मी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत गोल्ड मास्क म्हणजेच सोन्याचा मास्क तयार केला आहे आणि मास्क मी वापरतो आहे असं या व्यापाऱ्याने सांगितलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पाहा व्हिडीओ

 

शंकर कुऱ्हाडे यांच्या मास्कचीही चर्चा

शंकर कुऱ्हाडे या पिंपरीतल्या गोल्ड मॅनने काही दिवसांपूर्वीच सोन्याचा मास्क तयार करुन घेतला होता. या मास्कची किंमत जवळपास ३ लाखांच्या घरात आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी शंकर कुऱ्हाडे हा मास्क वापरत आहेत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन कटकमधल्या व्यावसायिकाने सोन्याचा मास्क तयार केला आहे.