पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एक गाडी दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात सहा सुरक्षारक्षक जखमी झाले. दार्जिलिंगमधील गोराबारी भागामध्ये ही घटना घडली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा गोराबारी भागातून जात असताना ही घटना घडली. यामध्ये राष्ट्रपती आणि ममता बॅनर्जींच्या गाडीला कोणताही अपघात झालेला नाही. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून राष्ट्रपतींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.


या घटनेनंतर लगेचच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी सुरक्षारक्षकांना घटनास्थळावरून बाहेर काढून लगेचच रुग्णालयात भरती केले. अत्यंत वेगाने बचाव पथकाने आपले काम केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी जवानांना सन्मानित करण्याचे जाहीर केले आहे.