लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर त्यांचा हा निर्णय बदलावा व तेच काँग्रेस अध्यक्षपदावर कायम रहावेत, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. याच मागणीसाठी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी तर चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.
Delhi: A Congress worker attempted suicide by trying to hang himself outside Congress Office. He says, "Rahul Gandhi should take back his resignation else I will hang myself." pic.twitter.com/AhoClvzEPk
— ANI (@ANI) July 2, 2019
विशेष म्हणजे हा प्रकार दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेरच घडला. या ठिकाणी एक कार्यकर्ता मुख्यलाबाहेर आला व समोरच असलेल्या झाडाला स्वतःला लटकवून घेऊ लागला. हा प्रकार पाहून आसपासच्या काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले. त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
कार्यकर्त्याने म्हटले आह की, जर राहुल गांधी राजीनामा परत घेणार नसतील तर मी या ठिकाणीच आत्महत्या करेन. या अगोदर राहुल गांधींची मनधरणी करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 4:00 pm