21 January 2021

News Flash

“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनला आपात्कालीन वापरास संमती मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी दिली खास प्रतिक्रिया

संग्रहित छायाचित्र

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असं मोदींनी या क्षणाचं वर्णन केलं आहे.

“जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल. या मोहीमेसाठी जीवतोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच, “ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लसी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. तो आत्मनिर्भर भारत, ज्या आधार आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया…” असं देखील मोदी म्हणाले आहेत.

Coronavirus Vaccines : दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित – सोमाणी

“कठीण परिस्थितीममध्ये असाधारण सेवाभावासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व करोना योद्ध्यांच्याप्रती कृतज्ञता व्यकत करतो आहे. देशवासियांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही सैदव त्यांचे आभारी राहू.” असं म्हणत मोदींनी करोना योद्ध्यांचे कौतुक केलं आहे.

मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती

तर, या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 1:13 pm

Web Title: a decisive turning point to strengthen a spirited fight narendra modi msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus Vaccines : दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित – सोमाणी
2 अखेर कष्टाचं चीज झालं; अदर पुनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद
3 अखिलेश यादव यांचा बदलला सूर!; आता म्हणतात लसीकरणाची तारीख लवकर घोषित व्हावी
Just Now!
X