20 September 2020

News Flash

बाप-लेकीच्या धाडसामुळे वाचला हजारो रेल्वे प्रवाशांचा जीव, सेहवागनेही केलं कौतुक

एका बाप-लेकीच्या प्रसंगावधान आणि साहसामुळे त्रिपुरात हजारो रेल्वे प्रवाशांचा जीव वाचला आहे

एका बाप-लेकीच्या प्रसंगावधान आणि साहसामुळे त्रिपुरात हजारो रेल्वे प्रवाशांचा जीव वाचला आहे. त्रिपुरातील आदिवासी स्वपन देबबर्मा आणि त्यांची मुलगी सोमती या घटनेनंतर चर्चेत आले आहेत. १५ जून रोजी ही घटना घडली. त्यांच्या या धाडसपणाचं भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवगानही कौतुक केलं आहे.

त्रिपुराच्या धलाई येथे राहणारे स्वपन देबबर्मा यांनी सांगितल्यानुसार, ‘त्या दिवशी घरात तांदूळ नव्हते. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. मी आणि मुलगी सोमती मासे पकडण्यासाठी घराबाहेर पडलो. जेव्हा आम्ही रेल्वे रुळाजवळ पोहोचलो तेव्हा ट्रॅकखालची माती सरकली असल्याचं दिसलं. जर ट्रेन थांबवली नाही तर हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागेल याची आम्हाला कल्पना होती. आम्ही दोन तास ट्रॅकवर बसून होतो. ट्रेन येताच मी शर्ट काढून त्यांना इशारा देऊ लागलो. पण ट्रेन थांबत नसल्याचं पाहून मी रुळावर जाऊन उभा राहिलो आणि मुलीलाही ओढून घेतलं. हजारो लोकांसाठी दोन जीव गेले तरी चालतील असा विचार आम्ही केला’. पण सुदैवाने दोघांना ट्रॅकवर उभं राहिलेलं पाहून मोटरमनने ट्रेन थांबवली आणि मोठा अपघात टळला.

या घटनेशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने एका रात्रीत स्वपन देबबर्मा आणि त्यांच्या मुलीला प्रसिद्ध केलं आहे. ३९ वर्षीय स्वपन देबबर्मा सध्या बँकेत खातं खोलण्यासाठी कागदपत्रं जमा करत आहेत. सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत ते खातं उघडू शकले नव्हते. चौथीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडणारे स्वपन एक आदिवासी आहेत. दोन वेळच्या अन्नाची मारामारी असताना या घटनेनंतर त्यांना अनेक पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

स्वपन यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड नाही आहे. मी खूप प्रयत्न केला पण बँक खातं उघडू शकलो नाही. मी जंगलातून लाकूड नेऊन स्थानिक बाजारात विकतो. दिवसाला ६० ते ७० रुपयांची कमाई होते. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून स्वपन देबबर्मा एक हिरो झाले आहेत.

विशेष म्हणजे भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत त्यांचं कौतुक केलं आहे. त्रिपुरामधील लोक त्यांना सुपरमॅन ते देवाचा अवतारपर्यंत सर्व काही म्हणत आहेत असं सेहवगाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 11:25 am

Web Title: a father and daughter saved hundreds lives in tripura become heros
Next Stories
1 VIDEO : गुजरातमध्ये सिंहाच्या भुकेल्या छाव्यांची क्रूर थट्टा
2 लाखो संगीतप्रेमींना आता केवळ एका पिल्लाची प्रतीक्षा, होणार का सर्वात मोठा म्युझिक शो?
3 Social Media Day BLOG : ‘नमो’भक्त नी ‘नमो’रूग्णांचा उच्छाद
Just Now!
X