30 September 2020

News Flash

कनिष्ठ जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध, वडिलांनी गळा दाबून केली मुलीची हत्या

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे

वर्गातील मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याने वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे. वैष्णवी असं या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. शेजाऱ्यांना घरात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी वेंका रेड्डी यांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेंका रेड्डी यांना मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं कळल्यानंतर मुलीसोबत जोरदार भांडण झालं. यानंतर वेंका रेड्डी यांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. ‘आरोपी वडिलांना आपली मुलगी प्रियकरासोबत पळून जाईल अशी शंका वाटत होती. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एकदा फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास राव यांनी दिली आहे.

वैष्णवीचे वर्गातील मित्रासोबत प्रेमसंबंध होते. मित्र कनिष्ठ जातीतील असल्याने वेंका रेड्डी यांनी नात्याला विरोध केला होता. त्यांनी पुन्हा कधी मित्राला न भेटण्यास सांगितलं होतं ज्याला मुलीने नकार दिला. यानंतर संतापाच्या भरात त्यांनी गळा दाबून मुलीची हत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:10 pm

Web Title: a father killed daughter over relation with friend
Next Stories
1 एअर इंडियाच्या जेवणात सापडलं झुरळ
2 मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत गोव्याच्या विधानसभा उपाध्यक्षांनी केला खुलासा
3 धक्कादायक! जोडप्याने उबर ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे फेकले नाल्यात
Just Now!
X