News Flash

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग

अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एम्स रूग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमरजन्सी लॅबजवळ ही आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे ही लॅब बंद करण्यात आली आहे. तसेच रूग्णालायता कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हेदेखील याच रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच या ठिकाणी अनेक बडे नेतेही त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 5:20 pm

Web Title: a fire has broken out on first and second floor at aiims msr 87
Next Stories
1 UAPA कायद्यातील दुरूस्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
2 लडाख हा भारताचा अंतर्गत भाग, शेजाऱ्यांना अडचण असेल तर…
3 पाकिस्तानची चौकी भारतीय लष्कराने केली उद्ध्वस्त
Just Now!
X