News Flash

पिझ्झा देतो सांगत मुलीवर सामूहिक बलात्कार, घरमालकाच्या मुलाला अटक

राजधानी दिल्लीत दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

( प्रतिकात्मक छायाचित्र )

राजधानी दिल्लीत दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला पिझ्झा देण्याचा बहाणा करत आपल्यासोबत नेलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.

मुलगी राहत असलेल्या घरातील मालकाच्या मुलाने शुक्रवारी पिझ्झा देतो असं सांगत आपल्यासोबत नेलं होतं. आरोपी तिला घेऊन आपल्या रुमवर गेला जिथे आधीच त्याचे तीन मित्र उपस्थित होते. तिन्ही मित्र नशेच्या अवस्थेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

चौघांनी मिळून तरुणीवर बलात्कार केला आणि याबद्दल कुठे भाष्य केल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. पीडित मुलगी गरीब असून कल्याणपुरी भागातील कल्याण व्यास येथे एका झोपडपट्टीत राहते. तर चारही आरोपी विनोद नगर परिसरात राहतात.

आई कामावरुन घरी आली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आई मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये घरमालकाचा २८ वर्षीय मुलगाही आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 6:00 pm

Web Title: a girl gangraped in delhi lured with pizza
Next Stories
1 ‘या’ उपकरणामुळे समजणार कसा झाला रेल्वे अपघात
2 बनावट नोटा छापल्या प्रकरणी हॉकी खेळाडूला अटक, मिळाली होती तीन कोटींची ऑर्डर
3 मोंदीसाठी शेतकरी नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदीच ‘भाई’: राहुल गांधी
Just Now!
X