01 December 2020

News Flash

टीव्हीवर सतत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

सुशांत सिंगच्या आत्महत्येचं वृत्त पाहून तरुणीने संपवलं जीवन

सुशांत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाटणा येथे ही घटना घडली आहे. मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि निकालाची वाट पाहत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “दहावीची परीक्षा चागंली न गेल्याने ती तणावात होती. सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर ती वारंवार टीव्हीवर त्याच्या बातम्या पाहत होती. सोशल मीडियावरही त्याच्याबद्दलच सर्व व्हिडीओ पाहत होती. मी तिला वारंवार अशा बातम्या पाहू नको सांगत होती पण ती ऐकायला तयार नव्हती”.

आई काही कामासाठी गच्चीवर गेली असता मुलीने बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात धाव घेतली असंही त्यांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:35 pm

Web Title: a girl hangs self after watching sushant singh rajput suicide news in patna sgy 87
Next Stories
1 चपलेनं मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नेता सोनाली फोगाट यांना अटक
2 संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे साथ देणार, सहकार्य करणार – सोनिया गांधी
3 पंतप्रधान मोदींसोबत १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X