News Flash

अब्रू वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षामधून मारली उडी

रिक्षाचा वेग कमी होताच संधी साधत तरुणीने रिक्षामधून उडी मारली आणि स्वत:ची सुटका करुन घेतली

कोलकातामध्ये एका तरुणीसोबत रिक्षामध्ये छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अब्रू वाचवण्यासाठी तरुणीने चालत्या रिक्षामधून उडी मारत आपली सुटका करुन घेतली. दक्षिण कोलकातामधील व्यस्तम परिसरातील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असतानाही एकाही व्यक्तीने पुढाकार घेत तरुणीची मदत केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी एका एनजीओत काम करते. रविवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती घराबाहेर पडली होती.

रात्री आपल्या मित्रासोबत जेवण केल्यानंतर जवळपास १०.२० वाजता तरुणीने जाधवपूर पोलीस स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. तिथून दुसरी रिक्षा पकडून तरुणी अनवर शाह रोडवरील आपल्या घरी जाणार होती. गरियाहाट रोडवर रिक्षाचालकाने चार तरुणांना रिक्षात घेतलं. तरुणांनी रिक्षात बसताच तरुणीची छेड काढण्यास सुरुवात केली.

तरुणीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं. मात्र नंतर एका व्यक्तीने ब्लेडने तरुणीचे कापडे फाडण्यास सुरुवात केली. तरुणीने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं, मात्र त्याने नकार दिला. रिक्षाचा वेग कमी होताच संधी साधत तरुणीने रिक्षामधून उडी मारली. घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने घर गाठलं.

सोमवारी तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देत तक्रार केली. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचालक आणि इतरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:20 pm

Web Title: a girl jumps off running rickshaw in west bengal
Next Stories
1 जाणून घ्या कर्नाटकमधील काँग्रेसच्या पराभवानंतर कोण काय म्हणाले
2 येडियुरप्पांची विधीमंडळ नेतेपदी निवड; राज्यपालांची घेतली भेट
3 कठुआ प्रकरण – आरोपींच्या बचावासाठी हिंदू संघटनेचं देणगीचं आवाहन
Just Now!
X