11 August 2020

News Flash

मित्रासोबत पित होती दारु, आईचा ओरडा पडू नये म्हणून सांगितलं बलात्कार झाला

पोलिसांनी तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे एका व्यक्तीला अटकही केली होती

उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थिनीने आईचा ओरडा पडू नये यासाठी बलात्काराची खोटी गोष्ट रचली होती. तरुणी आपल्या मित्रासोबत दारु प्यायली होती. दारुच्या नशेत असतानाच ती रस्त्यावर पडली, ज्यामुळे तिचे कपडे फाटले. आईने विचारल्यावर काय सांगायचं यासाठी तरुणीने चक्क आपल्यावर बलात्कार झाल्याचं खोटं सांगितलं. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं असता त्यांनी कोंचिग सेंटरच्या संचालकाला अटक केली. तपास पुढे गेला असता ही धक्कादायक माहिती समोर आली. सत्य समोर आल्यानंतर कोचिंग सेंटरच्या संचालकाला क्लीन चिट देण्यात आली.

हे प्रकरण गाजियाबाद जिल्ह्यामधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून तरुणाशी ओळख झाली होती. ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. ४ सप्टेंबरला दोघे एका पार्कमध्ये भेटले होते. यावेळी दोघांनी दारु प्यायली होती.

घऱी परतत असताना तरुणी दारुच्या नशेत रस्त्यावर पडली. यावेळी तरुणीचे कपडे फाटले. यानंतर मित्राने तिला तिच्या घरी पोहोचण्यास मदत केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी एक तास उशिरा घरी पोहोचली होती. आईचा ओरडा पडू नये यासाठी तिने खोटी गोष्ट सांगितली. तरुणीने आईला आपल्यालवर बलात्कार झाल्याचं सांगितलं मात्र सत्य काही वेगळंच होतं.

तरुणीने बलात्कार झाल्याचं सांगताच नातेवाईक तिला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. यानंतर पोलिसांनी कोचिंग सेंटरच्या संचालकाला अटक केली. पण वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाला नसल्याचं निष्पन्न झालं. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता तरुणी मित्रासोबत असल्याचं समोर आलं. यानंतर तिने नेमका प्रकार सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2018 5:13 pm

Web Title: a girl plotted fake story of rape
Next Stories
1 रुपयांवर भाषण करणाऱ्यांचे आता मौनव्रत: काँग्रेस
2 Section 377 : ‘आम्हीही याला गुन्हा मानत नाही; मात्र, हे संबंध अनैसर्गिकच’ : रा. स्व. संघ
3 या पाच जणांमुळे न्यायालयाला बदलावा लागला समलैंगिकतेचा कायदा
Just Now!
X