News Flash

चुलत भावाचा मित्रांसोबत मिळून बलात्कार, मोबाइलमध्ये शूट केला व्हिडीओ

गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता

हैदराबादमध्ये चुलत भावानेच मित्रांसोबत मिळून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपींनी तरुणीला ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने पोलिसांना सांगितल्यानुसार, बलात्कार केल्यानंतर चुलत भावाने फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करुन इतरांना तो पाठवला होता. या व्हिडीओची भीती दाखवत आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते.

तरुणीवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची त्यांच्या कुटुंबाला काहीच कल्पना नव्हती. गेल्या महिन्यात एका भरोसा केंद्राला तरुणीने भेट दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तरुणीने माहिती दिल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, चुलत भावाने घराच्या वरच्या मजल्यावर आपल्यावर बलात्कार केला आणि हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. त्याने पेयात गुंगीचं औषध देऊन पाजलं होतं. नंतर त्या व्हिडीओचा वापर करुन तो वारंवार लैंगिक अत्याचार करत होता.

पण ही फक्त सुरुवात होती. नंतर आरोपीने व्हिडीओ आपल्या इतर मित्रांसोबत शेअर केला. त्यांनीदेखील तरुणीवर बलात्कार केला. एका आऱोपीला पोलिसांनी साक्षीदार केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. ‘एका आरोपीला साक्षीदार कसं काय केलं जाऊ शकतं. आरोपीच्या अजून एका मित्रालाही साक्षीदार बनवण्यात आलं आहे. त्यांनी न्यायालयात चुकीची माहिती दिली तर ? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे’, असं तरुणीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

तरुणीने अटक करण्यात आलेल्या तिघांव्यतिरिक्त अन्य आठ जणांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांना मोर्चा काढत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 8:41 am

Web Title: a girl raped by cousin brother with friends for 4 years
Next Stories
1 फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब ताब्यात घेण्यात काँग्रेस अपयशी
2 काँग्रेस उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीनिशी लढणार – राहुल गांधी
3 भेटवस्तू वाटपावरून राज्यपाल बेदी आणि मुख्यमंत्र्यात वाद
Just Now!
X