News Flash

तब्बल १० किमी चालत मुलीने वडिलांविरोधात दाखल केली तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांनी मुलीच्या तक्रारीची दखल घेतली आहे

आपल्या हक्कांसाठी सहावीत शिकणाऱ्या मुलीने १० किमी चालत आपल्या वडिलांविरोधात तक्रार दिल्याची घटना समोर आली आहे. मध्यान्ह भोजनासंबंधी आपल्याला मिळणारे फायदे वडिल घेत असल्याची तक्रार देण्यासाठी मुलगी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचली होती. ओडिशामध्ये ही घटना घडली आहे.

मुलीने दिलेल्या लिखित तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी पैसे मुलीच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. इतकंच नाही तर तिच्या वडिलांनी बेकायदेशीरपणे मिळवलेले मुलीच्या हक्काचे पैसे आणि तांदूळ पुन्हा तिला मिळवून देण्यासही सांगितलं आहे.

लॉकडाउन सुरु झाल्यापासून सरकार प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात दिवसाला आठ रुपये जमा कर आहेत. जर विद्यार्थ्याचं बँक खातं नसेल तर पालकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. याशिवाय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत १५० ग्रॅम तांदूळ दिला जात आहे.

मुलीचं बँक खातं असतानाही सर्व पैसे वडिलांच्या खात्यात जात होते असा मुलीचा दावा आहे. मुलगी आपल्या वडिलांसोबत राहत नसून आपल्या नावे शाळेतून तांदूळदेखील ते घेत होते असंही मुलीने सांगितलं आहे. मुलीच्या आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे. मुलगी सध्या आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास आहे.

“जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, मुलीच्या हक्काचे पैसे तिच्या खात्यात जमा केले जातील, तसंच तिच्या वडिलांकडून पैसे वसूल केले जातील,” अशी माहिती जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी संजीब सिंग यांनी दिली आहे. याशिवाय तांदूळदेखील मुलीलाच दिले जावेत असा आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 3:04 pm

Web Title: a girl walks 10km to file complaint against father in odisha sgy 87
Next Stories
1 ‘गुपकार गँग’ने देशाचा मूड सांभाळला नाहीतर … – अमित शाह
2 …आता मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कडक कायदा येणार
3 भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या कुटुंबावर शोककळा, फटाक्यांनी भाजल्याने सहा वर्षाच्या नातीचा मृत्यू
Just Now!
X