News Flash

Video : बिहारमध्ये गुंडाराज, महिलेला टोळक्याची भरदिवसा मारहाण

खंडणी देण्यास नकार दिल्याने भररस्त्यात एका महिलेवर गुंडांचा हल्ला

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडालाय हे पुन्हा एकदा समोर आले आहे. खंडणी देण्यास नकार दिल्याने एका महिलेला गुंडांनी भररस्त्यात मारहाण केल्याचं समोर आलं आहे. ही महिला एका खासगी शाळेची मालकीण आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्यात हे गुंड हवेत गोळीबार करतानाही दिसत आहेत.

शनिवारी 4 ते 5 जणांच्या टोळक्याने शाळेसमोरच महिलेवर हल्ला चढवला. तिला मारहाण करण्यात आली आणि धमकी देवून व हवेत गोळीबार करुन आरोपी तेथून फरार झाले. महिलेकडे आरोपींनी खंडणीची मागणी केली होती, पण तिने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला व मारहाण झाली असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2019 6:36 pm

Web Title: a group of men assault a private school owne in bihar after she refused to pay extortion money
Next Stories
1 प्रयागराज कुंभ : ‘गोल्डन बाबा’ पोलिसांच्या ताब्यात
2 उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वबळावर, आश्यर्यकारक निकालांची वर्तवली शक्यता
3 ओबीसींना आणखी १० टक्के देऊन आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करा, आठवलेंची मागणी
Just Now!
X