News Flash

Israel V/s Palestine: गाझावर हल्ला करणाऱ्या इस्रायलच्या टीममध्ये होती गुजराती महिला

काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले

गाझावर हल्ला करणाऱ्या इस्रायलच्या टीममध्ये होती मुळं गुजराती महिला (file photo indian express)

काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले. इस्त्रायली सैन्य जगातील सर्वात धोकादायक सेना मानली जाते. या इस्रायलच्या सैन्यात मुळ गुजरातच्या असलेल्या दोन बहीणी आहेत. ज्या इस्रायलच्या सैन्यात सेवा करतात. खूप कमी वयात त्या सैन्यात भरती झाल्या.

मूळ जुनागड जिल्ह्यातील मानवदार तहसीलमधील कोठडी नावाच्या छोट्या खेड्यातील माहेर कुटुंब सध्या इस्रायलमध्ये स्थायिक आहे. त्याठीकाणी ते किराणा व्यवसाय करतो. या कुटुंबातील दोन्ही मुलींनी जगातील सर्वात शक्तिशाली इस्राएलच्या सैन्यात स्थान मिळवले आहे. मूळ कोठाडी गावचे रहिवासी जीवाभाई मुलियासिया व त्याचा भाऊ सावदासभाई मुलियासिया हे दोघेही इस्रायलच्या तेल अवीव येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुली निशा आणि रिया सध्या इस्त्रायली सैन्यात सेवा बजावत आहेत. यापैकी निशा मुलीसिया इस्त्रायली सैन्यात स्थान मिळविणारी पहिली गुजराती महिला आहे. निशा सध्या इस्त्रायली सैन्याच्या कम्युनिकेशन्स आणि सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये तसेच हेडलाईन फ्रंटलाइन युनिटमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचा-  Israel Airstrikes in Gaza: आगीच्या फुग्यांना फायटर जेट्सने दिलं उत्तर; सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ला

तसेच रियानेही बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. ती सध्या इस्त्रायली सैन्यात प्री-सर्विस मध्ये आहे. जे कमांडो ट्रेनिंगच्या बरोबरीचे आहे. ३ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर आणि विविध परीक्षा क्लिअर केल्यावर तीला सैन्यात पोस्टिंग मिळेल.

निशाबाबत तिचे वडील म्हणाले, “सैन्यात २.४ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर तिला पाच वर्ष किंवा दहा वर्षांच्या कालावधीसाठी करारावर स्वाक्षरी करावी लागेल, त्या काळात ती योग्यतेनुसार अभियांत्रिकी, औषध किंवा तिच्या आवडीचा अभ्यासक्रम घेऊ शकेल. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सैन्य उचलेल,”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 2:56 pm

Web Title: a gujarati woman was part of the israeli team that attacked gaza srk 94
टॅग : International News
Next Stories
1 येमेन : मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात जाहीर मृत्यूदंड; AK 47 ने गोळीबार करत दिली शिक्षा
2 राम मंदिर: आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराजांचे आवाहन
3 RSS ची नोंदणी का नाही झाली? संघ टॅक्स का भरत नाही? हे देशाचे मालक आहेत का? काँग्रेस नेत्याचे सवाल!
Just Now!
X