26 March 2019

News Flash

विवाहित महिलेसोबत होते संबंध, संशयातून केली हत्या; हातावर सुसाइड नोट लिहून रेल्वेसमोर घेतली उडी

महिला विवाहित असून, तीन मुलांची आई असल्याचं समोर आलं आहे

(प्रतिकात्मक छायाचित्र )

फसवणूक केल्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन नंतर स्वत: ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस तपासात महिला विवाहित असून, तीन मुलांची आई असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना आरोपी प्रियकराजवळ चार पानांची सुसाइड नोट सापडली आहे. यासोबतच त्याने आपल्या हातावरही सुसाइड नोट लिहिली आहे. सुसाइड नोटमध्ये त्याने महिलेवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील पुरानी कोंडली येथे राहणा-या ओमप्रकाश यांनी पोलिसांना फोन केला होता. त्यांनी आपली एक खोली पवन नावाच्या तरुणाला भाड्याने दिली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता आणि खोलीतून प्रचंड दुर्गंध येत होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोतून दरवाजा उघडून पाहिलं असता आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी महिलेच्या पती आणि वडिलांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. तपासादरम्यान, मृत महिलेचं नाव मोनिका असल्याचं समोर आलं. मृत महिला आपला पती आणि तीन मुलांसोबत लोनी येथे राहत होती. 2010 मध्ये तिचं लग्न झालं होतं. 8 ते 10 दिवसांपुर्वी मोनिका आपल्या माहेरी आली होती. यानंतर 9 मार्चला अचानक मोनिका घरातून गायब झाली होती.

पोलीस तपासानुसार, गेल्या पाच वर्षांपासून मोनिकाचे पवनसोबत संबंध होते. 9 मार्चला मोनिका पवन्या कोंडली येथील घरी गेली होती. त्याच रात्री पवनने फसवणूक केल्याच्या संशयातून मोनिकाची हत्या केली आणि फरार झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर पवनने उत्तर प्रदेशातील शामली येथे ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. पवनने आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली होती, ज्यामध्ये त्याने मोनिकाने केलेल्या फसवणुकीमुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. पवन अविवाहित होता आणि मोनिकाशी लग्न करु इच्छित होता.

First Published on March 14, 2018 10:26 am

Web Title: a man committed suicide after murdering married woman over character doubt