News Flash

माझा रक्तगट काय आहे ? RTI मधून मागितली माहिती

तुम्ही तुमचा रक्तगट माहिती करुन घेण्यासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी गेलात आणि चारही ठिकाणी वेगळा रिपोर्ट दिला तर काय होईल ?

तुम्ही तुमचा रक्तगट माहिती करुन घेण्यासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी गेलात आणि चारही ठिकाणी वेगळा रिपोर्ट दिला तर काय होईल ? नेमकं हाच अनुभव राहुल चित्रा यांना आला आहे. उद्या जर आपल्यालवर आणीबाणीची वेळ आली आणि रक्ताची गरज लागली तर नेमकं कोणतं रक्त आपल्याला मिळणार हेदेखील माहित नसल्याने ते त्रस्त आहेत. आपला रक्तगट माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी आता थेट आरटीआय दाखल केला आहे.

राहुल चित्रा यांनी आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजसहित काही खासगी प्रयोगशाळांमध्ये रक्तगटाची तपासणी केली होती. मात्र प्रत्येकाने त्यांना वेगवेगळा रिपोर्ट दिला. दिल्लीच्या पंत रुग्णालयातही त्यांनी तपासणी करुन पाहिली. तिथे तर त्यांना आधी बी निगेटिव्ह आणि नंतर बी पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. शेवटी राहुल यांनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचं दार ठोठावलं. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. यानंतर त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली.

आरटीआयच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाला एक विचित्र मात्र गंभीर प्रश्न विचारला आहे. आपला रक्तगच काय आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. उद्या जर महत्वाची वेळ आली आणि आपल्याला रक्ताची गरज लागली तर कोणत्या गटाचं रक्त देण्यात येईल अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

माहिती आयुक्त यशोवर्धन आजाद यांनी यासंबंधी सुनावणी करताना, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि राहुल चित्रा यांच्या आयुष्याशी संबंधित असल्याचं सांगितलं. राहुल चित्रा यांच्या रक्तगटासंबंधी कोणतीही स्पष्ट माहिती नाही असंही ते म्हणाले. आणीबाणीच्या स्थितीत कोणतं रक्त दिलं जाईल हा त्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि महत्वपूर्ण आहे. त्यांनी मागितलेली माहिती त्यांचा अधिकार आहे असंही त्यांनी म्हटलं.

यशोवर्धन आजाद यांनी यांनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचा युक्तिवाद फेटाळत केंद्रीय माहिती आयोगाला हे निवेदन एम्सच्या संचालकांना पाठवण्याचा आदेश दिला आहे. एम्स एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून तिथे अशा विशेष प्रकरणांवर संशोधन केलं जातं असं त्यांना यावेळी सांगितलं. आपला निर्णय सुनावताना, एम्स योग्य ती तपासणी करुन राहुल चित्रा यांना त्याची माहिती देऊ शकतं असं सांगितलं. आपल्या आदेशात त्यांनी, एम्सच्या संचालकांना योग्य ती पाऊलं उचलून, अर्जदाराला माहिती पुरवण्यास सांगितलं आहे.

आरएच फॅक्टरवरुन ठरतो आपला रक्तगट –
आर. एच. फॅक्टर नावाचा रक्तगटातील, ‘अँटिजीन रायसस’ माकडांच्या तांबड्या पेशीत आढळून येतो. ज्या लोकांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह व वयांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. व ज्यांच्या पेशीत हे अँटिजीन नसेल त्यांचा रक्तगट आर. एच. निगेटिव्ह असतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 11:26 am

Web Title: a man files rti to know his blood group
Next Stories
1 सोलापूर ते उत्तर कोरियातील भारताचे राजदूत; अतुल गोतसुर्वेंचा प्रेरणादायी प्रवास
2 पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबारात ४ भारतीय ठार, अनेकजण जखमी
3 इंडिका, इंडिगोचे उत्पादन टाटा मोटर्सकडून बंद
Just Now!
X