News Flash

महिला सहकाऱ्यावर जडलं प्रेम, तिला मिळवण्यासाठी प्रियकराची केली हत्या

गोळ्या झाडणारी व्यक्ती आपला सहकारी असेल याची महिलेला कल्पनाही नव्हती

महिला सहकाऱ्याला मिळवण्यासाठी केविन प्रसाद याने तिच्याच प्रियकराची हत्या केली. कॅलिफोर्नियामधील पोलीस अधिकाऱ्यांनी हत्येची माहिती देताना केविन प्रसाद असं काही करेल याची महिलेला कल्पनाही नव्हती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

३१ वर्षीय प्रसाद याचं आपल्या महिला सहकाऱ्यावर प्रेम जडलं होतं. दोघेही सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा पुरवण्याचं काम करत होते. प्रसाद याने अनेकदा महिलेकडे आपले प्रेम व्यक्त करत तिला मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अनेकदा तिला डेटसाठीही विचारलं. एकदा तर त्याने दागिनाही भेट म्हणून दिला होता. महिलेने मात्र आपल्याला तीन वर्षाचं मूल असून, आपला बॉयफ्रेंड असल्याचं स्पष्ट करत नकार दिला होता.

महिला आपल्या प्रियकरासोबत लास वेगासला शिफ्ट होणार होती. २५ एप्रिलला तिचा कामावरचा शेवटचा दिवस होता. ती जाण्याआधी प्रसादने तिची भेट घेतली आणि न जाण्याची विनंती केली. पण यामुळे दुखावलेल्या प्रसादने आपल्या मित्रासोबत महिलेचा पाठलाग केला आणि तिच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली.

प्रसाद याचं एकतर्फी प्रेम असलं तरी महिलेला मात्र त्याच्यापासून कधीच धोका असल्याचं वाटलं नव्हतं. गेल्या आठवड्यात जेव्हा महिलेचा प्रियकर मार्क याच्यावर गोळीबार झाला तेव्ही ती व्यक्ती महिलेचा सहकारी असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिसांनी चौकशी केली असता महिलेने आपला एक सहकारी आपल्याला डेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आणि तपास त्यादिशेने वळला. पोलिसांना तात्काळ धाव घेत प्रसाद याच्याभोवती फास आवळला. पोलिसांनी २४ तासाच्या आत प्रसाद आणि त्याचा मित्र डोनोवन याला अटक केली. दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:38 pm

Web Title: a man killed co workers boyfriend over one sided love
Next Stories
1 इस्त्रो कॅम्पसमधील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० गाडया घटनास्थळी
2 अब्रूनुकसानी खटला : जेटलींविरोधात केलेलं ते वक्तव्य केजरीवालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे – कुमार विश्वास
3 आधार कार्डामुळे खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेट्स
Just Now!
X