News Flash

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नी आणि मुलांची हत्या करुन आत्महत्या

आरोपीने मुलांना आणि पत्नीला विष पाजून नंतर स्वत: आत्महत्या केली

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या करुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप असं ३७ वर्षीय व्यक्तीचं नाव असं आहे. गाजियाबाद येथील शताब्दी नगर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना दरवाजा तोडून घरात प्रवेश करावा लागला.

घरात पोलिसांना तिनही मुलांचे मृतदेह सापडले. प्रदीपच्या शेजारीच मुलांचे मृतदेह पडले होते. मुलांच्या तोंडाला पट्टी बांधण्यात आली होती. पोलीस हा खूप दारु पित असे. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याला संशय होता. “पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली. प्राथमिक तपासात, तो खूप मद्यपान करायचा ही माहिती हाती आली आहे. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत असा संशय त्याला होता”, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुधीर कुमार सिंह यांनी दिली आहे.

पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोटही सापडली असून यामध्ये प्रदीपने आपण हे पाऊल का उचललं यासंबंधी सविस्तर लिहिलं आहे. “सुसाइड नोटमध्ये त्याने आपण आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊन नंतर त्यांचं तोंड बंद केलं. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करत आहोत” असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सुरुवातीला प्रदीप आणि दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. प्रदीपची पत्नी आणि तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यू झाला. पोलिसांनी प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 5:35 pm

Web Title: a man kills wife and children and committed suicide over suspision of extra marital affair ghaziabad sgy 87
Next Stories
1 महिला पोलिसाने चोराच्या ATM कार्डावरुन काढले अडीच लाख रुपये
2 देशातील लोकशाही धोक्यात, जातीवादी पक्ष जबाबदार – एच डी देवेगौडा
3 Budget 2019: डिफेन्स बजेट ‘जैसे थे’, संरक्षण साहित्याच्या आयातीला सीमा शुल्कातून मुक्तता
Just Now!
X