News Flash

धक्कादायक ! विकृताचा कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार, घटना सीसीटीव्हीत कैद

एका महिलेने हा प्रकार पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली

चेन्नईत एका विकृत व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने हा प्रकार पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली. महिलेने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आपण या विकृत घटनेचे साक्षीदार असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने गुरुवारी हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर लगेच तक्रार दाखल केली.

न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने कुत्र्याच्या पिल्लांना उचलून घेताना महिलेने पाहिलं होतं. सुरुवातीला महिलेला ती व्यक्ती पिल्लांना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटलं. पण अचानक त्या व्यक्तीने पँटची चेन काढली आणि पिल्लांवर लैंगिक अत्याचार केले. महिलेने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते तेथून निघून गेला होता. महिलेच्या घराजवळच पिल्लांचा जन्म झाला असून त्या त्यांची काळजी घेत आहेत.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपण याआधीही आरोपीला पाहिलं आहे. आपण जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचलो होतो तेव्हा वारंवार आपल्याकडे घटनेची सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात येत होतं. महिलेने घटनेचं सीसीटीव्ही दिल्यानंतरही पोलीस फुटेज अस्पष्ट असल्याने आरोपीची ओळख पटवणं कठीण असल्याचं सांगत होते.

दरम्यान पोलिसांनी आपण काय कारवाई करु शकतो यासाठी कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती दिली आहे. कोणत्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करायचा याची खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:08 pm

Web Title: a man rapes new born puppies
Next Stories
1 भारत-पाकने चर्चा करुन तोडगा काढावा, चीनच्या नेतृत्वाखालील SCO चा सल्ला
2 पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, सैन्यातील जवान शहीद
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होळीच्या शुभेच्छा
Just Now!
X