30 May 2020

News Flash

Lockdown: आई, वडील, पत्नी सर्वांचा मृत्यू; ३० वर्षांनंतर घरी परतल्यानंतर बसला धक्का

महंगी प्रसाद १९९० मध्ये काही कारणावरुन नाराज होत घर सोडून गेले होते

लॉकडाउनमुळे सध्या देशभरातील मजूर, कामगार मिळेल त्या मार्गाने  प्रवास करत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. तीस वर्षांपूर्वी महंगी प्रसाद यांनी रागाच्या भरात घर सोडलं होतं. पण लॉकडाउनमुळे त्यांनीही आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सर्व काही बदललं होतं. आई, वडील, पत्नी यांचा मृत्यू झाला होता. लहान असताना ज्या मुलीला सोडून गेले होते ती मुलगी घरात होती.  मुलीला जवळ घेत महंगी प्रसाद यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील कैथवलिया गावातील महंगी प्रसाद १९९० मध्ये काही कारणावरुन नाराज होत घर सोडून गेले होते. त्यावेळी त्यांचं वय ४० होतं आणि लग्नही झालं होतं. घरात आई-वडील, पत्नी आणि तीन मुली होत्या. य सर्वांना सोडून महंगी प्रसाद मुंबईला निघून गेले. तिथे त्यांनी अनेक छोटी-मोठी कामं करत आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. पण ३० वर्षात त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला पण काही थांगपत्ता न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं वाटलं होतं.

महंगी प्रसाद घर सोडून गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनीच घराची सर्व जबाबदारी घेतली. त्यांनीच तिन्ही मुलींचं लग्न लावून दिलं. काही दिवसांनी महंगी प्रसाद यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे जेव्हा हातचं काम गेलं तेव्हा महंगी प्रसाद यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शेवटी परिस्थितीला कंटाळून महंगी प्रसाद यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. ३५०० रुपये देऊन भाजीच्या गाडीतून प्रवास करत ते गोरखपूरपर्यंत पोहोचले आणि तेथून पायी चालत निघाले.

गावापासून थोड्या अंतरावर असताना महंगी प्रसाद रस्ता चुकले होते. ३० वर्षांनी येत असल्याने सर्व काही बदललेलं होतं. गावातील एक व्यक्तीने त्यांना पाहिलं आणि ओळखलं. ती व्यक्ती महंगी प्रसाद यांनी गावात घेऊन गेली. महंगी प्रसाद म्हणतात, आपण शहरात पैसा खूप कमावला पण साठवला नाही. आपण एका मुलाचं आणि पतीचं कर्तव्य पार पडू शकलो नाही याचं खूप दु:ख असल्याचं ते सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:06 am

Web Title: a man returned home after 30 years due to lockdown in uttar pradesh sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर, तिथेच घडल्या घुसखोरीच्या ८० टक्के घटना
2 भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम; विकसित केला ‘पोलीस आंबा’ आणि ‘डॉक्टर आंबा’
3 “सगळीकडे नुसता धूर आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या, मी कसाबसा…” ‘त्याने’ सांगितलं विमानात काय घडलं
Just Now!
X