News Flash

“बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही”, पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

घटस्फोटाच्या अर्जासाठी दिलेलं हे कारण ऐकून कुटुंब सल्ला केंद्रातील अधिकारी गोंधळात पडले आहेत

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. आपली पत्नी खाण्यासाठी फक्त लाडू देत असल्याने एका व्यक्तीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पत्नी मांत्रिकाच्या प्रभावाखाली असून यामुळेच ती आपल्याला वारंवार लाडू खाण्यासाठी देत असल्याचा पतीचा आरोप आहे.

पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. “पत्नी मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार आपल्याला जेवताना लाडू खायला देते. रोज सकाळी चार आणि संध्याकाळी चार लाडू ती खायला लावते. यादरम्यान आपल्याला इतर कोणतंही अन्न खाण्यास दिलं जात नाही”, असं पतीच म्हणणं आहे.

दांपत्याचं १० वर्षांपुर्वी लग्न झालं असून त्यांना तीन मुलं आहेत. पतीने दिलेल्या माहितीनुसार, आपण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होतो. यानंतर पत्नी एका मांत्रिकाच्या संपर्कात आली होती. या मांत्रिकाने फक्त लाडू खायला घाला असा सल्ला दिला आहे.

घटस्फोटाच्या अर्जासाठी दिलेलं हे कारण ऐकून कुटुंब सल्ला केंद्रातील अधिकारी गोंधळात पडले आहेत. “आम्ही समुपदेशनासाठी दांपत्याला बोलावू शकतो. पण फक्त अंधश्रद्धाळू आहे म्हणून महिलेवर उपचार करु शकत नाही. पतीला लाडू खाण्यास दिल्याने तब्येत सुधारेल असा तिचा विश्वास आहे आणि इतर कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास ती तयार नाही”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:09 pm

Web Title: a man seeks divorce as wife only gives laddo to eat sgy 87
Next Stories
1 सरकारी बंगले रिकामे करा!; २०० हून अधिक माजी खासदारांना मोदी सरकारची नोटीस
2 Chandrayan-2 : ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री यान चंद्रावर उतरणार – इस्रो
3 मोदी जगात भारी… Man vs Wild मध्ये सहभागी झाले अन् ‘हा’ विक्रम करुन आले
Just Now!
X