22 April 2019

News Flash

धक्कादायक ! भांडणानंतर संतापाच्या भरात पत्नी आणि नवजात बाळाला पेटवलं

पतीने संतापाच्या भरात पत्नी आणि नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

पतीने संतापाच्या भरात पत्नी आणि नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडण झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर पत्नी आणि चार महिन्यांच्या बाळाला पेटवून दिलं. हैद्राबादमध्ये ही घटना घडली आहे.

कोंडापूर गावातील ग्रामस्थांना दोन्ही मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. चार महिन्यांपूर्वीच पत्नीने बाळाला जन्म दिला होता. पतीसोबत भांडणं होऊ लागल्याने महिला गेल्या काही महिन्यांपासून आई-वडिलांसोबत राहत होती.

शनिवारी संध्याकाळी भेट झाली तेव्हा दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. यानंतर महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि बाळालाही दिली. आरोपीने याचा फायदा घेत पत्नीची हत्या केली आणि बाळासोबत पेटवून दिलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

First Published on February 11, 2019 11:50 am

Web Title: a man sets wife and infant on fire