News Flash

दोन तासात ‘जिवंत’ झाली दोन वर्षांपासून मृत असणारी व्यक्ती

नोएडा प्रशासनाने गुरुवारी ऑफिस सुरु करताच फाइलमध्ये दोन वर्षांपुर्वी मृत असणारे खजान सिंह (८६) यांना फक्त दोन तासात जिवंत करण्याची किमया केली

प्रतिनिधिक छायाचित्र

नोएडा प्रशासनाने गुरुवारी ऑफिस सुरु करताच फाइलमध्ये दोन वर्षांपुर्वी मृत असणारे खजान सिंह (८६) यांना फक्त दोन तासात जिवंत करण्याची किमया केली. प्रशासनाने आपली चूक मान्य करत कर्मचाऱ्याकडून चूक झाल्याचं सांगितलं. सदरपूरचे रहिवासी असणारे खजान सिंह सर्वोच्च न्यायालयात जमिनीचा मोबदला मिळण्याची केस जिंकल्यानंतर आपला हक्क मिळवण्यासाठी प्रशासनाकडे पोहोचले तेव्हा फाइलमध्ये आपली नोंद मृत व्यक्ती म्हणून असल्याचं कळलं आणि त्यांना धक्का बसला. १०० हून जास्त फेऱ्या मारुनही आणि वारंवार विनंती करुनही कोणती सुनावणी होत नव्हती. खजान सिंह यांनी आपण जिवंत असल्याचे सर्व पुरावे दिले होते. जिवंत असूनही फाइलमध्ये मात्र मृत्यू झाल्याची नोंद असल्या कारणाने खजान सिंह यांना ना त्यांचा हक्क मिळत होता, ना ते आपली संपत्ती विकू शकत होते.

खजान सिंह यांच्या मृत्यूची नोंद कशी झाली याची पडताळणीही करण्यात आली. २०१३ मध्ये ३१ लोक सर्वोच्च न्यायालयात जमिनीच्या मोबदल्याची केस जिंकून आले होते. २०१६ मध्ये जेव्हा रेकॉर्ड अपडेट करण्यात आले तेव्हा जिल्हाधिकारी आणि लेखापालने कोणत्याही पुराव्याविना त्यांचा उल्लेख मृत म्हणून करुन टाकला. नजरचुकीमुळे ही चूक झाली होती, मात्र त्यानंतरही चूक सुधारण्यात आली नाही. अशी चूक झाल्यास १० ते १५ दिवसांत ती दुरुस्त करता येते. त्यासाठी प्रतिज्ञापत्र आणि बँक खात्याचं स्टेटमेंट देण्याची गरज असते. पण नेहमीच्या सरकारी कामामुळे हे प्रकरण रखडलं होतं.

प्रशासनाने अखेर आपली चूक मान्य करत खजान सिंह यांचा रेकॉर्ड अपडेट केला आहे. सोबतच चौकशीचा आदेशही दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 2:24 pm

Web Title: a man who was noted dead in files came alive
Next Stories
1 न्यायसंस्था वाचवण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवायला हवं – काँग्रेस
2 चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंड, केंद्राकडून प्रक्रियेला सुरुवात
3 ‘भारत बंद’ दरम्यान जीव गमावणारा विद्यार्थी वर्गात पहिला
Just Now!
X