News Flash

नीती आयोगाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण, कार्यालयाचा तिसरा मजला केला सील

नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

देशभरात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. आता दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील कार्यालयाचा तिसरा मजला पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तिसरा मजला सील करण्यात आला असून सध्या तिथे निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवली जात आहे.

यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, दिल्लीत करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज(दि.1) दिल्लीच्या सीमा सात दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना आणि व्यक्तींना बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 2:44 pm

Web Title: a niti aayog official tests positive for coronavirus sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 माणुसकी… ‘या’ ८१ वर्षीय शीख व्यक्तीने महाराष्ट्रात येणाऱ्या-जाणाऱ्या २० लाख लोकांना दिलं जेवण
2 दिल्लीचं आणखी एक पाऊल पुढे! सलून उघडणार, औद्योगिक क्षेत्रही सुरू होणार
3 श्रमिक ट्रेन्स मार्ग चुकल्या असा दावा करणाऱ्या प्रियंका गांधींना रेल्वेचं उत्तर; म्हणाले…
Just Now!
X