करोनावरची लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरु आहेत. काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातलीही चाचणी सुरु आहे. मात्र लस आली म्हणजे परिस्थिती जादूची कांडी फिरवल्यासारखी बदलेल असं होणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
A number of vaccines are now in phase-3 clinical trials & we all hope to have a number of effective vaccines that can help prevent people from infection. However, there’s no silver bullet at the moment & there might never be: Dr Tedros, Director-General, World Health Organisation https://t.co/jVVshlJJ4A
— ANI (@ANI) August 3, 2020
जगभरात अनेक देशांमध्ये करोनावरची लस आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. क्लिनिकल ट्रायल्सही सुरु आहेत. त्यामुळे करोना संसर्गातून वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र लस आली तरीही जादूची कांडी फिरवल्यासारखी परिस्थिती बदलेल असं नाही. कदाचित कधीच बदलणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढचे काही महिने ही करोना नावाची महासाथ असू शकते असाही इशारा WHO ने दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 8:07 pm