News Flash

पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि गळा दाबला-प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा खळबळजनक आरोप

पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि गळा दाबला असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. पोलिसांनी मला घेराव घातला, त्यानंतर मला धक्काबुक्की केली तसंच माझा गळा दाबला असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असंही त्यांनी म्हटलं आहे.

CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी या दारापुरी येथे गेल्या होत्या. “मी कारमधून शांततेने जात होते, तिथे शांततेचा भंग कसा काय होणार होता ते मला माहित नाही. माझ्यासोबत तीनपेक्षा जास्त कार्यकर्ते नव्हते. मात्र मला रोखण्यात आलं. त्यानंतर मी पायी चालण्यास सुरुवात केली. तुम्ही मला अडवू शकत नाही मला अटक करायची असेल तर खुशाल करा असं मी त्यांना म्हटलं.” मात्र त्यावेळी महिला पोलिसांनी मला अडवलंच नाही तर माझा गळा दाबण्यात आला आणि धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

प्रियंका गांधी यांची कार लोहिया येथील चौकात अडवण्यात आली. ज्यानंतर प्रियंका गांधी यांनी हे विचारलं की मला का रोखण्यात आलं? मात्र त्यावर पोलिसांनी काही उत्तर दिलं नाही. उलट एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची गाडी प्रियंका गांधी यांच्या कारपुढे आडवी लावली. यानंतर प्रियंका गांधी या कारमधून खाली उतरल्या आणि चालत जाऊ लागल्या अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक सिंह यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 9:29 pm

Web Title: a police woman strangulated manhandled me says priyanka gandhi scj 81
Next Stories
1 खतरनाक! या विद्यापीठात शिकवली जाणार भूत विद्या!
2 राजकारण्यांनी काय करायचं हे सांगणं लष्कराचं काम नाही – चिदंबरम
3 #CAA मुस्लीम बांधवाने हिंसक जमावापासून वाचवले जखमी पोलिसाचे प्राण
Just Now!
X