लव्ह जिहादवरुन देशभरामध्ये जोरदार चर्चा सुरु असतानाच आता अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर धर्माच्या आधारावर अश्लील साहित्य उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्रियांमधील संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तकं उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

‘इंडियन हिंदू वाईफ्स अफेर विथ हर मुस्लीम लव्हर’ हे त्यापैकीच एक पुस्तक आहे. हे पुस्तक किंडलच्या अनलिमिटेड स्बस्क्रीप्शनमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाची लेखिका निलिमा स्टीव्हन्स आहे. ३५ पानांच्या या पुस्तकाच्या कव्हरवर मुस्लीम पुरुष आणि टिकली लावलेली हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये लग्न झालेली हिंदू महिला श्वेता आणि तिची मुस्लीम मैत्रिण रझीया हिचा पती अशरफ यांच्यामधील लैंगिक संबंधांबद्दल अगदी अश्लील भाषेत वर्णन करण्यात आलं आहे. अश्लील वर्णनाबरोबरच या पुस्तकामध्ये शाकाहारी असणारी हिंदू श्वेता ही अशरफमुळे मांसांहार करु लागली असंही सांगण्यात आलं आहे. याच लेखिकेची किंडलवर २० हून अधिक अशाच प्रकारची पुस्तके आहेत. असेच एक पुस्तक आहे ‘इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर’. या पुस्तकामध्ये अय्यर कुटुंबतील महिला आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मुरर्शिद शेख यांच्यामधील संबंधांबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. या पुस्तकामध्ये मद्रासी देहविक्री करणारी, हिंदू वेश्या अशा आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला आहे.

actress surabhi bhave rply to fan
“सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका
russion yutuber harrassed by indian man
“तू खूप सेक्सी आहेस, माझं स्वप्न…”; भारतीय तरुणाकडून रशियन युवतीचा विनयभंग, VIDEO व्हायरल
Nita Ambani Dance on Zingaat in ajay-atul live concert in nmacc
Video: अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ

नक्की पाहा >> लव्ह जिहाद : जगातील ‘या’ देशांंमध्ये दुसऱ्या धर्मातील व्यक्तींशी लग्न केल्यास…; जाणून घ्या अजब कायदे

‘चिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्ड’ या पुस्तकामध्येही हिंदू महिला आणि मुस्लीम व्यक्तीमधील संबंधांचे अगदी अश्लील वर्णन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पुस्तकही निलिमा स्टीव्हन्सचेच आहे. अशाप्रकारे अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंधांबद्दल भाष्य करणारं बरंच अश्लील साहित्य या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचं स्वराजमाग डॉट कॉमनं म्हटलं आहे.

सुनिता सारन या नावाच्या लेखिकेचीही अनेक पुस्तकं अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर उपलब्ध आहेत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक दाढी असणारा पुरुष आणि दोन महिला दिसत आहेत. एका महिलेने साडी नेसलीली असून दुसरी अंगावर चादर ओढून बसलेली दिसत आहे. हा डॉन या महिलांना धमकावून त्यांच्यावर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडीओ बनवून दाखवण्याची धमकी देतो अशी कथा या पुस्तकात आहे. या महिलांना डॉनची भिती वाटत असली तरी त्यांना यामध्ये सुख मिळत असतं असंही वर्णन या पुस्तकात आहे.  अशाप्रकारे प्रविश सिंग नावाच्या लेखकाचे ‘हिंदू वाईफ सेक्सी एन्काऊन्टर विथ मुस्लीम ड्रायव्हर’ या नावानेही अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर पुस्तक उपलब्ध आहे.

नक्की पाहा >> Video: झुडपांमध्ये जोडप्याचे सुरू होते अश्लील चाळे, संतापलेल्या आजीबाई आल्या आणि…

नक्की पाहा >> चांगलं खाणं आणि सेक्स दैवी आनंद देणाऱ्या गोष्टी : पोप फ्रान्सिस

अ‍ॅमेझॉन किंडलवर थेट पुस्तकं प्रकाशित करण्याची सोय उपलब्ध आहे. या सेवेमुळे एक अकाऊंट बनवल्यानंतर पुस्तकं प्रकाशित करता येतात. यासाठी काही पैसे मोजावे लागता. अनेकदा नवीन लेखक खोट्या नावाने अकाऊंट सुरु करुन अशी पुस्तकं प्रकाशित करतात. या सेवेमध्ये अ‍ॅमेझॉनने काही विशिष्ट घटकातील लोकांच्या भावना दुखावणारा मजकूर प्रकाशित करता येणार नाही असं नियमांमध्ये म्हटलं आहे. अशी पुस्तकं आढळून आल्यास वाचकांना त्यासंदर्भात रिपोर्टही करता येतो. ‘ऑफेन्सिव्ह अ‍ॅण्ड क्रॉन्ट्राव्हर्शियल मटेरियल’ असं या पुस्तकांना मार्क करुन रिपोर्ट करता येतं. मात्र अनेक नियम असले तरी ही पुस्तकं उपलब्ध आहेत हे किंडलवर सर्च केल्यावर लगेच दिसून येतं.

नक्की वाचा >> महिलांना Sex Slaves बनवणाऱ्याला १२० वर्षांचा तुरुंगवास