News Flash

१४ नोव्हेंबरपासून सुरु होणार रामायण एक्स्प्रेस

१६ दिवसांची असणार पॅकेज टूर

संग्रहित

सध्या देशात राम मंदिर, रामाचा पुतळा, प्रभू रामचंद्र हे सगळेच विषय सुरु आहेत. मंदिर कधी बांधले जाणार? हा प्रश्नही विचारला जातो आहे. अशात भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. रामायण एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार आहे. यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. तसेच ही एकूण १६ दिवसांची सहल असणार आहे असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. १६ दिवसांची ही पॅकेज टूर असणार आहे. एक टूर जाऊन आली की मग दुसरी जाणार आहे. दिल्लीहून या एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला जाईल.

एकीकडे देशात प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जाणार, पुतळा उभारला जाणार असे म्हटले जाते आहे. योगी आदित्यनाथ यांनीही शरयू नदीच्या किनारी रामाच्या पुतळ्याची घोषणा केली आहे. तर राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा असे म्हटले जाते आहे. अशात आता भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. या पॅकेज टूरचे शुल्क किती असेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा कोण दाखवणार? हेदेखील ठरलेले नाही. मात्र या एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 5:25 pm

Web Title: a shri ramayana express will be flagged off on 14th november 2018 from delhi
Next Stories
1 रुग्ण बनला प्रियकर, आता नर्सने केला बलात्काराचा आरोप
2 भाजपा मला गाय दान करेल का?-ओवेसी
3 “सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मूल जन्माला आले असते”
Just Now!
X