News Flash

एअर इंडियाच्या विमानाला छिद्र, प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

दरम्यान, एअर इंडियाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

एअर इंडियाच्या बोईंग ७७७ विमानाच्या एका छायाचित्रावरुन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानाच्या दरवाजाजवळ एक छिद्र दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे विमान अमेरिकेत सुरक्षितरित्या उतरले आहे. दरम्यान, एअर इंडियाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी यासंबंधी ट्विट करुन सांगितले की, बी ७७७ एअरक्राफ्ट, व्हीटी-एएलएच हे विमान अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे यशस्वीरित्या उतरले आहे. या विमानाची तपासणी सुरु असताना त्याच्या दरवाजाजवळ पत्रा कापला गेल्याने एक छोटासे छिद्र दिसून आले. यानंतर एअर इंडियाने अमेरिकेतील एअरक्राफ्ट मेनटेनन्स करणाऱ्या एजन्सीकडून मदत मागितली आहे.

खरतंर छोटे असलेले हे छिद्र विमानाच्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकले असते. मात्र, अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, विमानाच्या या छिद्राचे छायाचित्र समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 9:37 pm

Web Title: a small cut or crack on bottom right corner of left side to entry door of air india aircraft
Next Stories
1 बापरे! देशातल्या ‘या’ शहरातील तापमानाने केली पन्नाशी पार
2 जगमोहन रेड्डी शब्दाला जागले, सत्तेत येताच आशा सेविकांच्या मानधनात तिपटीने वाढ
3 सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर बंद
Just Now!
X