24 November 2020

News Flash

आईच्या मृत्यूनंतर तीन वर्ष फ्रिजमध्ये जतन करुन ठेवला मृतदेह

वडिलांसाठीही दुसरा फ्रिज आणून ठेवला होता

आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने तीन वर्ष मृतदेह फ्रिजमध्ये जतन करुन ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलकातामध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. शुभभ्रता मुझुमदार असं या आरोपी मुलाचं नाव आहे. शुभभ्रता याच्या आईचा तीन वर्षांपुर्वीच मृत्यू झाला होता. पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता त्याने तो डीप फ्रिजमध्ये जतन करुन ठेवला. दरम्यान, महिलेचा मृत्यू होऊन तीन वर्ष झालेली असतानाही कोणाला संशय कसा आला नाही याचं पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शुभभ्रता मुझुमदार याच्या आईचं २०१५ मध्ये वृद्धापकाळाने निधन झालं होतं. तेव्हापासून शुभभ्रता मुझुमदारने आईचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. यासाठी त्याने केमिकल्सची मदत घेतली होती. धक्कादायक म्हणजे आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचाही मृतदेह अशाचप्रकारे जतन करण्याची सोय त्याने करुन ठेवली होती.

शुभभ्रता मुझुमदार याने ९० वर्षीय वडिलांसाठी दुसरा फ्रिजही घरात आणून ठेवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी शुभभ्रता मुझुमदारला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 11:07 am

Web Title: a son kept mother dead body in freeze
Next Stories
1 रेल्वेत ‘एसी’ डब्यांमधून प्रवास करणा-यांसाठी चांगली बातमी
2 भाजपाला रोखण्यासाठी विरोधीपक्षांनी काँग्रेसविरोध सोडावा; शरद पवारांचा नवा मंत्र
3 Blackbuck Poaching Case: सलमान, सोनाली बेंद्रे, तब्बूला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा?
Just Now!
X