News Flash

सुपारी देऊन विधवा आईची केली हत्या, नंतर मारेकऱ्याला दारु पाजून केले मृतदेहाचे तुकडे

तीन वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे

सुपारी देऊन विधवा आईची केली हत्या, नंतर मारेकऱ्याला दारु पाजून केले मृतदेहाचे तुकडे

केरळमधील कोझिकोड येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आरोपीने आईची सुपारी देऊन हत्या  केल्यानंतर मारेकऱ्याची हत्या करत मृतदेहाचे तुकडे केले होते. पोल्ट्री फार्मच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पोलिसांना मृतदेहाचे तुकडे सापडले होते. क्राइम ब्रांचने गुरुवारी आईच्या हत्येप्रकरणी ५३ वर्षीय बिरजू याला अटक केली. हत्येमध्ये ४७ वर्षीय पी इस्माइल याचाही हात असल्याचं सांगितलं जात आहे.

आधी दिली आईच्या हत्येची सुपारी
क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरजूने आधी आपल्या विधवा आईची हत्या केली. आईची हत्या करण्यासाठी त्याने मलप्पुरम येथे राहणाऱ्या इस्माइलला सुपारी दिली होती. इस्माइल अनेक चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी होता. दोघांनी मिळून जयावेली यांची हत्या केली. यानंतर मृतदेह झाडाला बांधून आत्महत्या केली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सुपारी किलरने दिली गुन्हा उघड करण्याची धमकी
हत्येनंतर इस्माईलने बिरजूला हत्येचा गुन्हा उघड करण्याची धमकी दिली. यानंतर बिरजूने इस्माईलला आपल्या घरी बोलावून दारु पाजली आणि नंतर हत्या केली. यानंतर त्याने इस्माईलच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्यांना पॅक केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिलं. मृतदेहाचे काही तुकडे त्याने पोल्ट्री फार्मजवळ असणाऱ्या कचऱ्यात टाकले होते.

डीएनए टेस्टमुळे मृतदेहाची ओळख
मृतदेहाच्या तुकड्यांची डीएनए टेस्ट केली असता मृतदेह इस्माईलचा असल्याचं उघड झालं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आधी एका चोरीच्या प्रकरणात अटक झाली असल्याने फिंगरप्रिंटही जुळले. इस्माईलची ओळख पटवण्यासाठी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मृतदेहाचा डीएनएही जुळत होता. यानंतर चौकशी केली असता पोलिसांना माहिती मिळाली की, इस्माईलने आपण हत्येची सुपारी घेण्यासाठी मित्राकडे कोझिकोड येथे जाण्याबद्दल बोलत होता.

हत्या झाल्यानंतर बिरजू तामिळनाडूमधील निलगिरी येथे गेला होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 2:08 pm

Web Title: a son killed mother in kerala sgy 87
Next Stories
1 …तर अवघ्या एका तासात शाहीनबाग खाली करु: भाजपा खासदार
2 समाजसेवा करा; गुजरात दंगलीतील आरोपींना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3 सरन्यायाधीशांनी भाजपाला झापलं : राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका
Just Now!
X