ओडिशामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्यावरुन खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ओडिशामधील प्रसिद्ध पिकनिक स्पॉटवर ही घटना घडली आहे. मयुरभंज जिल्ह्यातील भिमकुंड धबधब्यावर विद्यार्थी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत सेल्फी काढत होता. यावेळी त्याचा तोल गेला आणि अचानक धबधब्यावरुन खाली पडला.

विद्यार्थी कट्टकचा रहिवासी आहे. रोहोन मिश्रा असं त्याचं नाव आहे. एएनआयने घटनेचा व्हिडीओ शेअर केल्यापासून यामध्ये विद्यार्थी पाण्यात वाहत जाताना दिसत आहे. विद्यार्थी काठावर येण्याचा प्रयत्न करतो मात्र पाण्याचा वेग इतका असतो की तो पुढे वाहत जात असतो. काठावर उपस्थित लोक विद्यार्थ्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात मात्र त्यांना यश येत नाही.

दुर्घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एम्सने केलेल्या सर्व्हैनुसार, गेल्या सहा महिन्यात जगभरात सेल्फी काढण्याच्या नादात 250 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सेल्फी घेताना बुडून तसंच ट्रेनसमोर आणि उंचीवरुन पडून मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे.