News Flash

दिल्ली विमानतळावरील बेवारस बॅगेत सापडले RDX

रात्री एक वाजण्याच्या सुमारास सापडली संशयास्पद बॅग

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक संशयास्पद बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. टर्मिनस तीनवर मिळालेल्या या बॅगेत सुरक्षा यंत्रणांना आरडीएक्स असल्याचे अढळून आले आहे. या बेवारस बॅगेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेतली. या बँगेत आरडीएक्स मिळाल्याचे वृत्त समोर आले असले तरी दुपारी बारावाजेपर्यंत तरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावरील टर्मिनस तीनच्या पिलर क्रमांक चार जवळ मध्यरात्री एकच्या सुमारास तपासणीदरम्यान सीआयएसएफचे हवालदार व्ही. के. सिंह यांना एक संशयास्पद बॅग अढळून आली. त्यानंतर या बॅगेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक या बॅगेची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. संक्षयास्पद बॅग मिळाल्याची बातमी मिळाल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. बॅग ज्या ठिकाणी होती तेथील परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. टर्मिनस तीनमधून कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता तिच्यामध्ये आरडीएक्स असल्याचे आढळून आले. असे असले तरी सीआयएसएफने या बॅगेमध्ये काय आहे हे फोरेन्सिक चाचणीनंतरच समजू शकेल असं म्हटलं आहे.

“या संशयास्पद बॅगेत आरडीएक्स किंवा अन्य स्फोटक असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. विमानतळाबाहेरील प्रवेशद्वाराजवळ एक बेवारस बॅग मिळाली असून ती बॅग बॉम्बप्रूफ गाडीतून फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. या बॅगेत नक्की काय आहे हे तपासणी केल्यानंतर २४ तासांमध्ये समजू शकते,” असं सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक एम.ए. गणपती यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:55 pm

Web Title: a suspicious bag was spotted in the igia airport premises scsg 91
Next Stories
1 बापरे… एका रात्रीत तो २४ वर्षीय तरुण ट्रम्प यांच्यापेक्षा झाला अधिक श्रीमंत
2 सामान्यांना पुन्हा झटका; सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ
3 अभिमानास्पद…! मराठमोळे सतिश खंदारे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक
Just Now!
X