News Flash

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर आयकर विभागाची धाड, सुरजेवाला यांचीही चौकशी

पैसे कुणाचे आहेत ते माहित नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. एका कारमधून साडेआठ लाख रुपये मिळाल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोयल यांचीही चौकशीही करण्यात आली आहे. आयकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. हे पैसे कुणाचे आहेत माहित नाही असं गोयल यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीची कारवाई तासभर सुरु होती.

शक्ती सिंग गोयल यांनी याप्रकरणी आयकर विभागावरही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की पैसे काँग्रेस मुख्यालयात नाही तर मुख्यालयाच्या परिसरात पार्क केलेल्या एका कारमध्ये सापडले आहेत. तरीही काँग्रेसला नोटीस बाजवण्यात आली आहे असं असलं तरीही आम्ही तपासात सहकार्य करु. रक्सोलमध्ये भाजपाच्या उमेदवाराकडे २२ किलो सोनं आणि अडीच किलो चांदी सापडली आहे. आयकर विभागने तिथे कारवाई का केली नाही असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 10:04 pm

Web Title: a team of income tax officials arrive at congress office in patna to serve a notice to them after money was recovered from a vehicle parked outside their compound scj 81
Next Stories
1 करोनाची लस आल्यानंतर ती मध्यप्रदेशच्या जनतेला मोफत देणार-शिवराज सिंग चौहान
2 JEE Main 2021: पुढील वर्षापासून आणखी प्रादेशिक भाषांमध्ये होणार जेईई मुख्य परीक्षा
3 मला एकांतवासात ठेवलं गेलं.. उमर खालिदचा कोर्टात तिहार जेल प्रशासनावर आरोप
Just Now!
X