जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत्या एका दहशतवाद्यास पकडण्यात आज जवानांना यश आले.  काश्मीरच्या सोपोर भागात जवानांनी ही कारवाई केली.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. प्राप्त माहितीनुसार या चकमकीत हिजबुलचा कमांडर आणि लश्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दियलगाम भागात दहशदवादी दडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली होती. दरम्यान, परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांनावर गोळीबार सुरू केला. प्रत्त्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. एसओजी, १६४- सीआरपीएफ आणि १९-आरआर या तुकड्यांच्या जवानांनी मिळून ही संयुक्त मोहीम राबवली. या अगोदर शोपिया जिल्ह्यातील खाजपुरा रेबन भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.