News Flash

दुर्दैवी! पतीचा करोनामुळे मृत्यू, पत्नीने नवव्या मजल्यावरून घेतली उडी

पतीचा मृत्यू झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या करोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर. (प्रातिनिधिक छायाचित्र। रॉयटर्स)

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात कहर सुरू आहे. पहिल्या लाटेपेक्षाही जास्त बळी दुसऱ्या लाटेत जात असून, धावपळ करूनही अनेकांना आपल्या प्रियजणांचा जीव वाचवण्यात अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे अचानक कोसळणाऱ्या या दुःखामुळे अनेक जण टोकाचं पाऊल उचलताना दिसत असून, अशीच एक घटना इंदौरमध्ये घडली आहे. पतीचं कोविडमुळे निधन झाल्यानंतर एका महिलेनं नवव्या इमारतीवरून उडी घेत स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. “महिलेनं इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं घटनेची चौकशी केल्यानंतर समोर आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुजरातमध्येही पत्नीसह दोन मुलांनी केली आत्महत्या

गुजरातमधील द्वारका शहरातही शुक्रवारी (८ मे) अशीच घटना घडली. शहरातील रहिवासी जयेशभाई जैन (६०) हे नाश्त्याचं दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. ते पत्नी साधनाबेन जैन (५७) आणि कमलेश (३५) व दुर्गेश (२७) यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते.

जयेशभाई जैन यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. शुक्रवारी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं. जयेशभाई यांच्यावर शुक्रवारी सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलं घरी परतली. घरी परतल्यानंतर तिघांनीही विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचंच करोनानं निधन झाल्यानं तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 8:10 am

Web Title: a woman committed suicide in indore following the death of her husband due to covid 19 bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाचा प्राणवायूसाठी हस्तक्षेप
2 करोना उपचारांसाठी २ लाखांहून अधिक रोख  स्वीकारण्यास मुभा
3 ‘डीआरडीओ’च्या करोनाप्रतिबंधक औषधाला मान्यता
Just Now!
X