23 November 2020

News Flash

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ केला व्हायरल

बलात्काऱ्यांना अटक करा नाहीतर सामूहिक आत्महत्या करु असा इशारा पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशात एका महिलेवर दोघांकडून बलात्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कन्नौज पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपींनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२४ एप्रिलला हा सामूहिक बलात्कार झाला अशी माहिती पीडित महिलेच्या बहिणीने दिली आहे. ‘जर आरोपांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करु’, असा इशारा महिलेच्या बहिणीने दिला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब आणि सलमान अशी आरोपींची नावे असून दोघेही त्याच परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली असता आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. समाजात बदनामी होईल या भीतीने पीडित महिलेने घटनेबद्दल कुटुंबियांना काहीच सांगितलं नव्हतं.

आरोपींनी बलात्कार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ज्यानंतर पीडित महिलेने कुटंबियांसोबत स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी व्हिडीओच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवून लवकरच त्यांना अटक करु असं म्हटलं आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात १९ वर्षीय कॉलेज तरुणीवर तिच्या प्रियकराने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:14 pm

Web Title: a woman gangraped and video uploaded on social media in up
Next Stories
1 भारतात पसरले आगीचे लोण, नासाकडून प्रसिद्ध करण्यात आले फोटो
2 तरुणीची छेड काढून फाडण्यात आले कपडे, प्रत्यक्षदर्शी मदत करण्याऐवजी शूट करत राहिले व्हिडीओ
3 “खेळाडूंना नरेंद्र मोदींसारखी वागणूक आधीच्या एकाही पंतप्रधानानं दिली नाही”
Just Now!
X