28 October 2020

News Flash

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पतीची हत्या, मुलांची आईला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत

संग्रहित छायाचित्र

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी महिलेने आपल्या पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. आरोपी पत्नीची ओळख पटली असून सिमरन कौर असं तिचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला दोन मुलांची आई आहे. रविवारी रात्री आरोपी सिमरन कौरने आधी पतीच्या जेवणात विष मिसळलं. पण यामुळे मृत्यू होणार नाही अशी भीती वाटल्याने तिने गळा दाबून पतीची हत्या केली. आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याआधी तिने मुलांना पतीच्या वडिलांच्या घरी सोडलं आणि फरार झाली.

सिमरन आणि राजप्रीत सिंग यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली होती. त्यांना दोन मुलंही आहेत. लवप्रीत सिंग लव्हली याच्यासोबत सिमरनचे विवाहबाह्य संबंध होते. सिमरनच्या कुटुंबीयांनी तिला असं करण्यापासून रोखलं. मुलांच्या भविष्याचा विचार करता हे बंद कर असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र हे सगळं वाया गेलं.

मुलांनी आजोबांना आईने वडिलांचा दोरीच्या सहाय्याने गळा दाबल्याचं सांगितल्यानंतर ही घटना उजेडात आली. मुलांनी आपल्या आईला कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे. आईला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. घरी जाऊन पाहिलं असता राजप्रीतची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याच्या गळ्याभोवती दोरी होती आणि तोंडातून फेस बाहेर येत होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथेच त्याचा मृत्यू झाला.

राजप्रीतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सिमरन आणि तिचा प्रियकर लव्हलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा शोध सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:00 pm

Web Title: a woman kills husband to elope with lover children demand death sentence punjab sgy 87
Next Stories
1 काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलत आहेत त्यांना ठाऊक नाही-शशी थरुर
2 ‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती’; पतीने विचारलेल्या प्रश्नावर नुसरत जहाँ अवाक्
3 भारताच्या निषेधानंतर ट्रम्प यांच्या विधानावर अमेरिकेची माघार
Just Now!
X