News Flash

झोप लागलेल्या महिला प्रवाशासोबत ओला कॅब चालकाचं असभ्य वर्तन

आपल्या शरिराला स्पर्श होत असल्याची जाणीव झाल्यानंतर तरुणीला जाग आली

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रवासादरम्यान झोप लागलेल्या महिला प्रवाशाची छेड काढल्याप्रकरणी ओला कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे. २४ वर्षीय पीडित तरुणी एका बँकेत नोकरीला असून नरिमन पॉईंट ते पवई प्रवासासाठी तिने ओला कॅब बूक केली होती. प्रवासादरम्यान तरुणी पुढच्या सीटवर येऊन बसली होती. ईस्टर्न एक्स्प्रेस-वे सुरु होताच तिला झोप लागली. याचा फायदा घेत चालक सुरेशकुमार यादवने तिच्या शरिराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

आपल्या शरिराला स्पर्श होत असल्याची जाणीव झाल्यानंतर तरुणीला जाग आली. यावेळी त्याने तिचा गाल ओढला आणि पुन्हा झोपी जा म्हणत छेड काढू लागला. तरुणी कामावरुन निघाल्यानंतऱ आपल्या मित्राला भेटण्यासाठी चांदिवलीला चालली होती.

तरुणीने रात्री ९ वाजता एफआयआर दाखल केल्यानंतर चालक सुरेशकुमार यादवला अटक करण्यात आली. “तरुणीची तब्बेत ठीक नसल्याचं कळल्यानंतर चालकाने तिला पुढच्या सीटवर येऊन बसण्यास सांगितलं. पुढची सीट मागे ढकलता येत असल्याने तिथे आराम करत थोडी झोप मिळेल या विचाराने तरुणी पुढे येऊन बसली होती. यावेळी सीट अॅडजस्ट करण्याच्या बहाण्याने त्याने तिला दोनवेळा स्पर्शही केला. पण हे चुकून झालं असल्याचं समज तिने दुर्लक्ष केलं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी चालक सुरेशकुमार यादवला अटक केली आहे. त्याच्या नावे याआधी कोणता गुन्हा दाखल झाला आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:39 pm

Web Title: a woman passenger molested by ola driver
Next Stories
1 FB बुलेटीन: निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ते आयपीएलचा दुसरा प्लेऑफ सामना आणि इतर बातम्या…
2 बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास ग्राहकांना मिळणार संपत्तीत वाटा
3 कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Just Now!
X