News Flash

उन्नावमधील पीडितेला न्याय मिळण्यासाठी स्वत:च्या मुलीला पेटविण्याचा प्रकार

एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर ज्वालाग्राही पदार्थ ओतला.

दिल्ली येथे उन्नावच्या पीडित महिलेचा ९५ टक्के भाजलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सफरदरजंग रुग्णालयात शनिवारी दुपारी एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर ज्वालाग्राही पदार्थ ओतला. उन्नावच्या पीडित महिलेचा शुक्रवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला होता.  सामूहिक बलात्कार करून पेटवण्यात आलेल्या महिलेचा मृतदेह सफदरजंग रुग्णालयातून तिच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी नेण्यासाठी पाठवला जात असताना तासाभराने हा प्रकार झाला.

प्रसारमाध्यमांचे पत्रकार आजूबाजूच्या लोकांशी बोलत असताना एक महिला ओरडत आली व तिने आम्हाला न्याय हवा, अशा घोषणा दिल्या. त्याचवेळी तिने ज्वालाग्राही पदार्थ तिच्या मुलीच्या अंगावर ओतला पण तिने मुलीला पेटवून देण्यापूर्वीच पोलिसांनी सावध होऊन मुलीला वाचवले व महिलेला ताब्यात घेतले. या महिलेला उन्नाव येथील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाचा धक्का बसला होता व पीडित महिलेच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर सफदरजंग रुग्णालयात ती आली होती.  दरम्यान पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याजवळचा ज्वालाग्राही पदार्थ तपासणीसाठी पाठवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 10:05 pm

Web Title: a woman protesting against unnao rape case threw petrol on daughter nck 90
Next Stories
1 बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास महिन्याभरात फासावर लटकवा – नुसरत
2 हैदराबाद चकमकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
3 झारखंडमध्ये मतदानादरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
Just Now!
X