News Flash

गोव्यात महिलेची बलात्कार करुन हत्या, २३ वर्षीय तरुणाला अटक

गोव्यात एका महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

गोव्यात एका महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राजधानी पणजीपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या जुन्या गोव्यातील गावात ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर अनेक दिवसांनी महिलेचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. आरोपी कर्नाटकचा रहिवासी आहे.

‘आरोपी मंजुनाथ हा बंगळुरुचा असून गोव्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. शनिवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली’, अशी माहिती पोलीस अधिक्षक (नॉर्थ) चंदन चौधरी यांनी दिली आहे.

‘आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. बुधवारी रात्री त्याने लिफ्ट देण्याचा बहाणा करत महिलेला एका निर्जनस्थळी नेलं. तिथे त्याने महिलेवर बलात्कार करुन नंतर गळा दाबून हत्या केली’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिलेला आधीपासून ओळखत होता असंही त्यांनी सांगितलं आहे.

महिलेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यामध्ये महिलेचा लैंगिक छळ आणि हत्या झाल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण १५ पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:40 pm

Web Title: a woman raped and murdered in goa
Next Stories
1 न्यायाधीशाच्या कुटुंबावर गोळीबार, पोलिसांचा तपास मात्र अधांतरी
2 मुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”
3 गरबा खेळताना आपल्याच पत्नीकडे एकटक पाहणाऱ्या पतीला मारहाण
Just Now!
X