News Flash

तरुणीमुळे रचला हत्येचा कट, फ्लिटकार्टवरुन मागवले चाकू अन् त्यानंतर….; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

वडिलांच्या वाढदिवसाचा केक आणायला घऱाबाहेर पडलेल्या तरुणाची भरदिवसा हत्या

सीसीटीव्हीमधील फोटो

वडिलांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी केक आणायला घराबाहेर पडलेल्या १९ वर्षीय तरुणाची चौघांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणाला आवडणारी एक मुलगी आरोपीलाही आवडत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कुणाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. कुणाल केक आणण्यासाठी बेकरीत जात असताना आरोपींनी त्याला घेरलं आणि हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे कुणाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी त्यांच्यावर एकामागोमाग एक अनेक वेळा वार करत असल्याचं दिसत आहे. दक्षिण दिल्लीमधील आंबेडकर नगरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालच्या छाती, पाठीवर आरोपींना वार केले. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं.

हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू ऑनलाइन मागवण्यात आले होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. “आरोपी गौरव आणि पीडित कुणाला यांना एकच मुलगी आवडत असल्याने त्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. तपासादरम्यान आरोपींनी फ्लिपकार्टवरुन दोन चाकू मागवले होते समोर आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकऱणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 12:54 pm

Web Title: a youngster stabbed to death in delhi caugh on cctv sgy 87
Next Stories
1 Corona:पाटणा एम्समध्ये कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणी सुरु
2 “मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्याने करोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं आली”; सपा खासदाराचे वक्तव्य
3 दिलासादायक….सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत
Just Now!
X