एक वृद्ध व्यक्ती गेल्या वर्षभरापासून राजू या आपल्या मुलाच्या नावे राशन घेत होता. ज्यावेळी आधार कार्डची पडताळणी करण्यात आली त्यावेळी खरे वास्तव समोर आले आणि त्या वृद्ध व्यक्तीचे बिंग फुटले. राजू नावाचा मुलगा नव्हे तर श्वान आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यामधील दूरवर्ती गावांत घडली आहे.

येथील नरसिंह बोडार (वय ७५) यांनी आपल्या मुलाच्या नावावर पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टम (पीडीएस) या कोट्यातून ६० किलो राशन घरी आणले आहे. . पीडीएस आधिकारी नरसिंह यांच्या घरी आधार पडताळणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राजू या मुलाला बाहेर बोलवायला सांगितले. त्यावेळी त्यांना समजले की, राजू हा मनुष्य नसून श्वान आहे. गेल्या वर्षभरापासून नरसिंग राजूच्या नावावर राशन घेत होते. ज्यामध्ये ६० किलो गहू आणि तांदळाचा समावेश होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबधीत आधिकारी अनुराग वर्मा यांनी रेशन कार्डवरून राजू या कुत्र्याचे नाव हटवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

नरसिंह यांच्याकडे राजू नावाचा कुत्रा आहे. नरसिंह यांनी ग्राम पंचायतीकडून बोगस रेशन कार्ड बनवून घेतले. त्यात आपल्या दोन मुलांबरोबरच राजूचे नावही नोंदवण्यात आले. त्याच्यासमोर मुलगा म्हणून लिहण्यात आले. दरमहिन्याला प्रत्येक व्यक्तीच्या नावाने नरसिंह यांना ५ किलो धान्य रेशन दुकानातून मिळत होते. त्यानुसार वर्षभरात कुत्र्याच्या नावावर नरसिंह यांनी ६० किलो धान्य घेतले होते. दरम्यान सरकारी सेवेचा लाभ घेणाऱ्यांचे आधार कार्ड तपासण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले. यामुळे रेशन दुकानदाराने नरसिंह यांच्याकडे त्यांच्या रेशन कार्डवर नोंदवण्यात आलेल्या तीन व्यक्तींचे आधार कार्ड मागितले. यावर नरसिंह यांनी फक्त दोनच आधार कार्ड दुकानदाराला दाखवले. यामुळे दुकानदाराने तिसऱ्या राजू नामक व्यक्तीचे आधार कार्ड कुठे आहे असे नरसिंह यांना विचारले. त्यावर राजू व्यक्ती नसून आमचा पाळीव कुत्रा आहे. तो माझा मुलगाच आहे, असे नरसिंह यांनी सांगितले. नरसिंह यांचे हे उत्तर ऐकून दुकानदार व वरिष्ठ अधिकारी हैराण झाले