News Flash

विनोदी अभिनेता गुरप्रीत घुग्गीकडे पंजाबमध्ये ‘आप’ची जबाबदारी

विशेष म्हणजे खासदार भगवंत मान हेही एक विनोदी अभिनेता असून त्यांनीही अनेक विनोदी कार्यक्रमात काम केले आहे.

नूतन समन्वयक गुरप्रीत सिंग घुग्गी यांनी अभिनेता म्हणून छोटया पडद्यावर विनोदी कार्यक्रम केले.

आम आदमी पक्षाने (आप) पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्षाने विनोदी अभिनेता गुरूप्रीत सिंग घुग्गी याच्याकडे राज्य समन्वयकाची जबाबदारी दिली आहे. यावर्षीच घुग्गी यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी सुच्चा सिंग छोटेपूर यांच्याकडे ही जबाबदारी होती. परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रारंभी सुच्चा सिंग यांच्याकडे पंजाबची जबाबदारी सोपवली होती.
नूतन समन्वयक गुरप्रीत सिंग घुग्गी यांनी अभिनेता म्हणून छोटया पडद्यावर विनोदी कार्यक्रम केले. तसेच नमस्ते लंडन, हमको दिवाना कर गए, सिंग इज किंग या चित्रपटांमधून अक्षयकुमार सोबत काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लॉफटर चॅलेंज’ शोमुळे घुग्गी लोकप्रिय झाले होते.
दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून सुच्चा सिंग छोटेपूर यांना समन्वयक पदावरून हटवण्यात आले होते. सुच्चा सिंग हे एका उमेदवाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर खासदार भगवंत मान यांच्यासह पक्षाच्या २१ सदस्यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून सुच्चा सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
विशेष म्हणजे खासदार भगवंत मान हेही एक विनोदी अभिनेता असून त्यांनीही अनेक विनोदी कार्यक्रमात काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या संगरूर मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 9:04 am

Web Title: aam aadmi party appoints gurpreet singh ghuggi as punjab convener
Next Stories
1 चीन-पाकिस्तान मार्गाबद्दल भारताकडून चिंता व्यक्त
2 संघातील वादाच्या पाश्र्वभूमीवर मनोहर पर्रिकर गोव्यामध्ये
3 शिफारशींचे पालन न केल्याने १२३ गायींचा मृत्यू
Just Now!
X