भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या परवानगीविनाच त्यांच्या छायाचित्राचा प्रचारात वापर करून आम आदमी पार्टीने सकृद्दर्शनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आपचे  चिटणीस पंकज गुप्ता यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली असून आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल केला आहे. सोमवापर्यंत याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.