News Flash

‘पीके’च्या प्रमोशनसाठी आमिरने आयएसआयची मदत घेतली; सुब्रमण्यम स्वामींचा आरोप

केंद्रीय मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे आमिर खानची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून गच्छंती झाली होती

Subramanian Swamy, Aamir Khan, PK, ISI, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
अनेक केंद्रीय मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे आमिर खानची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून गच्छंती झाली होती.

असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या अभिनेता आमिर खानवर भाजप नेत्यांकडून सुरू असलेली टीकेची झोड काही केल्या थांबताना दिसत नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी आमिर खानवर नवा आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. ‘पीके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची मदत घेतल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामी म्हणाले की, आमीरने २००३ मध्ये ‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयएसआयची मदत घेतली. ‘पीके’ चित्रपटाला अर्थसहाय्य कोणी केले होते. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला दुबई आणि आयएसआयकडून मदत मिळाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  दरम्यान, स्वामींच्या या वक्तव्यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे आमिर खान गेल्या काही दिवसांपासून वादाच्या गर्तेत सापडला आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे आमिर खानची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून गच्छंती झाली होती.

‘अतुल्य भारत’ मोहिमेतून आमिर खानची गच्छंती! 
‘आमिर खान देशद्रोही आहे, त्याला बाहेर फेकायलाच हवे’ 
आमिरने पत्नीला देशाची प्रतिष्ठा शिकवावी’ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 12:18 pm

Web Title: aamir khan collaborated with pak isi to promote his film pk subramanian swamy
टॅग : Isi,Pk
Next Stories
1 ‘मोदी सरकार सत्तेत असल्यामुळे राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज नाही’
2 भारत-पाक चर्चा याच महिन्यात!
3 महाराष्ट्र सदनाची मराठी विद्यार्थ्यांकडेच पाठ
Just Now!
X